दळखण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

शहापुर: तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दळखण व एएसबीबी संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालरोग, स्त्रीरोग, अस्थीरोग, दंतविकार या आजाराची नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घघाटन माजी आमदार पांडुरंग बरोरा  यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ. प्रदीप नाईक, मुख्य प्रशासकीय अधिकारी ( एसएमबीटी हॉस्पिटल )यांच्या शुभहस्ते झाले.  

यावेळी कार्यक्रमाप्रसंगी कोरोना काळात सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा "कोविड योद्धा"म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच या शिबिरामध्ये बालरोग, स्त्रीरोग, अस्थीरोग, दंतविकार या आजाराची नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके, मिलिंद देशमुख, शाम परदेशी, पप्पू मिश्रा, दळखण ग्रामपंचायतचे सरपंच मंगला डोके, उपसरपंच भगवान मोकाशी, ग्रामसेवक माधवी कदम, पांडुरंग मोकाशी,  नरेश जाधव, मनीष दोंदे, वैभव गंधे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...