भिवंडी कल्याण मार्गावर महाकाय झाड कोसळले ; सुदैवाने जिवीत हानी टळली


भिवंडी:  कल्याण-भिवंडी मार्गावर असलेल्या लाहोटी कंपाउंडच्या बाजूला एक महाकाय झाड कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी घडली नसली तरी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चार चाकी टेम्पो व एका दुचाकीवर हे झाड कोसळल्याने या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेने कल्याण भिवंडी मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.


पालिका आपत्ती व्यवस्थापन , वाहतूक पोलीस व अग्निशम दलाने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले झाड कटर मशीनच्या सहाय्याने कापून त्याला हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.विषेश म्हणजे हि घटना घडण्याआधी केवळ १५ ते २० मिनिटे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती मात्र वाहतूक पोलोसांच्या सतर्कतेने हि वाहतूक कोंडी सुटली आणि हे झाड कोसळले.त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीत हानी टळली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज;जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा