उल्हासनगरात इंदोर मधून दोन पिस्तूल विकण्यासाठी आलेले गजाआड 


उल्हासनगर : मध्यप्रदेशातील इंदोर या शहरातून दोन पिस्तूले व जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या इसमावर उल्हासनगर पोलिसांनी झडप घालून त्याला अटक केली आहे.त्याच्याकडील ही जीवघेणी शश्रे ताब्यात घेण्यात आली असून न्यायालयाने या इसमाला ५ दिवस पोलीस कष्ठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काल रात्री उशिराने मोहम्मद अब्बासी हा इसम इंदोर मधील रहिवासी कॅम्प नं.१  येथील सी ब्लॉक रोड परिसरात पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी फिरत असल्याची माहिती उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना मिळाली होती.


त्या माहिती वरून सहायक पोलिस आयुक्त डी.डी.टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ राजेंद्र कदम,उपनिरीक्षक सचिन शिंदे व डी.बी.पथकातील पोलिसांनी या परिसरात सापळा रचला.तेंव्हा मोहम्मद हा डी.टी.कलानी कॉलेज समोरील रोडवरून संशयरित्या उभा असताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक मेड इन जपान व दुसरे सिल्व्हर कलर असे २ पिस्तूले व ५  जिवंत काडतुस मिळून आली.ही पिस्तूले त्याने एका इसमाकडून व्रिकीसाठी घेतले असल्याची माहिती आरोपीने दिली असून त्याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती राजेंद्र कदम यांनी दिली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...