रुद्र प्रतिष्ठानचे वतीने सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर बसले जाणार सॅनिटायझर स्टॅन्ड 


ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य,सावरकर नगर प्रभाग समिती मधील प्रभाग क्र. १४ मध्ये रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंह यांच्या संस्थेच्या साहाय्याने सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर सॅनिटायझर स्टॅन्ड बसवण्यासाठीची संकल्पना शिवसेना गटनेते स्थानिक, नगरसेवक दिलीप चद्रकांत बारटक्के यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त बिपीन शर्मा, उपयुक्त अशोक बुरकुले, आरोग्य विभाग अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व हलदेकर, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली व लोकमान्य, सावरकरनगर प्रभाग समिती मधील प्रभाग क्र.१४ मध्ये  सार्वजनिक शौचालयाच्या  ठिकाणी बाहेर सॅनिटायजर स्टॅन्ड बसवण्यासाठीच्या संकल्पनेला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.


 


या संकल्पनेमुळे शौचालयत जाणारी प्रत्येक व्यक्ती आत जाताना किंवा बाहेर येताना सॅनिटायझर करून हात स्वच्छ करतील त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास आळा बसेल. यावेळी लोकमान्य प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त ससाणे, चारुशीला पंडित उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...