पाचपाखाडीत एक मोठं झाड उन्मळून पडलं


ठाणे -  पांचपाखाडीतील अमृतसिध्दी सोसायटीच्या दुस-या मजल्यावर आणि जवळच्याच दोन दुकानांवर आज सकाळी एक मोठं झाड उन्मळून पडलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. पाचपाखाडीतील तळवलकर जिमच्या जवळ रस्त्याच्या मधोमध एक मोठं झाड उन्मळून पडलं. यामुळे पूर्ण रस्ता अडवला गेला तर समोरच्या असलेल्या अमृतसिध्दी सोसायटीच्या दुस-या मजल्यावर आणि महावीर पॉवर लाँड्री आणि सोनू कार्गो शॉपवर हे झाड पडलं. 


दोन्ही दुकानांच्या छप्परांवर ते आल्यानं त्यांचं नुकसान झालं आहे. महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करून रस्ता मोकळा केला.


 


 


 


 


 


 


 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...