शुभमंगल विश्राम

मंडपवाले, बेंजोवाले, कॅटरर्स, आर्थिक अडचणीततर कपडे, ज्वेलर्सवाले गोत्यात


मुरबाड प्रतिनिधी : कोरोनाच्या साथीमुळे यंदा जमलेली लग्न कार्य पुढच्या वर्षी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.यामुळे मंडप,स्वयंपाकी,बेंजो,वाहनधारक,यांचा होणारा व्यवसाय बुडून आर्थिक अडचणीची शक्यता निर्माण होणार आहे.तसेच यंदाची होणारी लग्न पुढील वर्षी होणार असल्याने आणि पुढील वर्षीची होणारी लग्न कार्य यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी ची धावपळ वाढणार आहेतसेच दरवर्षी ग्रामीण भागात एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्न कार्य पार पडत असतात.तसेच या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी मंडप,हॉल,बेंजो, बँड,तसेच वधू व वर मंडळींसाठी येण्या जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येते.तसेच लग्नसराईत कपडे आणि दागिने खरेदी करतात.तसेच यावर्षी कोरोना व्हायरस च्या पसरलेल्या साथीमुळे लग्न कार्य,पुढील वर्षी पार पाडली जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत.तसेच यामुळे व्यावसायिकांचा धंदा बुडाला असून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...